कॉंग्रेसचे जि.प.सदस्य प्रभाकर आप्पासोनवणेंचा कार्यकर्त्यांसह ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

 कॉंग्रेसचे जि.प.सदस्य प्रभाकर आप्पासोनवणेंचा कार्यकर्त्यांसह ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश 

जळगाव दि.२१(प्रतिनिधी) : कांग्रेसचे जळगाव जिप गट नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा विनोद कुमार पाटील संचालक जिल्हा सह बॅक आर जी पाटील मा जि प सदस्य अमोल भिरूड मा चेअरमन शेतकी संघ संदीप भैया सोनवणे सरपंच वढोदा विठ्ठल सुर्यवंशी मा सरपंच कांट्रेक्टर गजानन सोनार यांच्या सह वीस सरपंच माजी जिप सदस्य अनेक पंचायत समिती सदस्य ग्राम पंचायत सदस्यांसह  जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रविन्द्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथे जाहिर प्रवेश दिला. यावेळी भाजपा संघटन मंत्री रविजी अनासपुरे जेष्ठ नेते राजेंद्र फडके आमदार अमोल दादा जावळे प्रदेश महिला सचिव डॉ केतकीताई पाटील माजी जि प अध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते भरत भाऊ पाटील यांची विशेष उपस्थिति होती प्रभाकर अप्पा सोनवणे गेली २९ वर्षा पासुन यावल तालूका कांग्रेस अध्यक्ष २० वर्ष जि प सदस्य कांग्रेस गट नेते जिल्हा उपाध्यक्ष अशी वाटचाल सुरू होती पण देशात पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास यही भाजपा का प्रयास देशाची महासत्ता कडे वाटचाल यावर विश्वास ठेवून 

तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचा सर्व समाजाला न्याय देण्याची भुमिका व महाराष्ट्राची प्रगती तसेच जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हयाचा होत असलेला विकास व जिल्हयात मजबूत संघटन यामुळे तसेच शासनाच्या व जळगाव जिल्हा परिषद नगर पालिकाच्या  माध्यमातून सर्व समाजाचा विकास करण्याचा दुष्टकोन समोर ठेवून प्रभाकर अप्पा सोनवणे भाजपा परिवारात सामिल झाले.

 यावेळी नितिन सपकाळे किरण तायडे विनोद कोळी अनिल पाटील योगेश कोळी शेखर तायडे पुंडरीक महाराज सावळे समाधान कोळी सिताराम कोळी प्रमोद सोनवणे बाळू शिंपी प्रविण सोनवणे आनंदा पाटील चंदू कोळी किशोर पाटील योगेश पाटील यांच्या सह अनेक समाज बांधवांनी प्रवेश केला त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेशाने यावल तालूकासह जळगाव जिल्हा कांग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे कांग्रेस गट बाजीने ग्रासली आहे यामुळे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावते आहे प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्यासह कांग्रेसच्या जवाबदार लोकप्रतिनिधींनी भाजपात जाहिर प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीसह सर्व समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे तर या भाजपा प्रवेशाने जळगाव जिल्हयात उत्साहाचे वातावरण आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने