वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्थेमार्फत पर्यावरण दिन साजरा

 वर्ल्ड व्हिजन इंडिया  सेवा भावी संस्थेमार्फत पर्यावरण दिन साजरा


धरणगाव,दि.५(प्रतिनिधी) : दिनांक ५ जुन २०२५ रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया कडून पर्यावरण दिन संपूर्ण  धरणगाव  तालुक्यात साजरा आला .  मागील सप्ताहा भर पासून जनजागृती पर्यावरण  व पर्यावरणाचे महत्व दिनांक ५ जुन ते १० जून २०२५ रोजी  पर्यंत  करणात येतआहे  या संपूर्ण सप्ताहा मध्ये एकूण २२ गावात जनजागृती  करण्यात  येत आहेत . यात  मुलांनी चित्रकला स्पर्धा ,पर्यावरण दिन , मनोगत , निबन्ध स्पर्धा , रॅली  व झाडे लावून तालुक्यात जनजागृती करण्यात आली . पर्यावरण किती महत्वाचा आहे व आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे , हे या पर्यावरण सप्ताहा मध्ये एकूण २२ गावात हा संदेश देण्यात आला . तसेच २२ गावातील ५० बाल गट च्या मुलांनी या पर्यावरण दिन साजरा करण्यात सहभाग घेतला.

निशाणे  बु , निशाणे खु  जांभोरे  सर्वे , भिलखेडे  तांडा पोखोरी अशा २२ विविध ठिकाणी दिनांक०५ जून २०२५ रोजी नवीन सुरवात  करण्यात आली . या वेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया  सेवा भावी   संस्थेचे  प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांना  वेगवेगळ्या गावात मार्ग दर्शन केले, प्रत्येक कुटूंबाने एक तरी झाडे लावले पाहिजे व पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे असे मार्ग दर्शन केले .  निशाणे बु गावाचे  सरपंच , ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतिलाल वळवी , अंकिता मेश्राम , कुलदीप पासी , आशीष इंगळे , स्वयंम सेविका  रचना जाधव , आरती पाटील ,  वैष्णवी  पाटील.  जितेंद्र पाटील   गावातील ग्रा. प . सदस्य  ,अंगणवाडी सेविका आर इ सि  टीचर , बाल स्वरक्षण समितीचे  सदश्य  आदी  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने