कमळगावअहिल्याबाई होळकर विद्यालयात बेन्टली सिस्टीम कंपनी पुणेतर्फे मोफत शालेय साहित्य वाटप
यावेळी संस्थेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासो पंडित आधार नाही दे यांच्या हस्ते श्री समाधान ईश्वर बोरसे यांचा शाल फोटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी श्री समाधान ईश्वर बोरसे सॉफ्टवेअर इंजिनिअर यांनी मुलांना भावी करिअर विषयी विशेष मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे इयत्ता दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम पाच गुणवंत विद्यार्थिनींचा शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे व बेंटली सिस्टीम कंपनी पुणे यांचे विशेष आभार मानण्यात आले.. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री पंडित आधार न्हायदे. संस्थेचे चेअरमन श्री चंद्रभान पोपटराव न्हायदे.श्री हेमलाल भावलाल न्हायदे माजी संचालक, श्री संजय मधुकर न्हायदे , श्री बाळु श्रीराम न्हायदे*संस्थेतील संचालक, मुख्याध्यापक श्री पी के नायदे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच , सूत्रसंचालन अर्जुन कोळी सर , श्री पाचपोळ सर,नितिन पाटील सर यांनी समाधान बोरसे यांचा विशेष परिचय करून दिला.,आर एम पाटील सर, विशाल सोनवणे सर, प्रशांत बाविस्कर सर, यांनी आभार प्रदर्शन केले,कचरे, भाऊसाहेब,विनोद दोडे सर , प्रविण सावळे सर ,दिनकर न्हायदे, सुनील धनगर, विजय बाविस्कर, अभिषेक मिस्तरी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी,पालकांनी व ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.