आ.प्रा.चंद्रकांत सोनवणेंची मागणीला ना.मंत्री गिरीश महाजन यांचा हिरवा कंदील यावल तालुक्यातील १३गावे होणार" सुजलाम् सुफलाम् "
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री श्री.गिरीश महाजन यांची भेट घेऊन चोपडा मतदारसंघातील प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणेबाबत बैठक आयोजित करणेसाठी विनंती केली होती. त्यानुसार दिनांक १७/०६/२०२५ रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरिशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन चोपडा मतदारसंघातील यावल तालुक्यातील १३ गावांना फायदेशीर अशा यावल उपसा सिंचन योजनेसाठी स्थायी समितीने जी परिगाणिके निश्चीत केली होती त्यानुसार यांत्रिकी व विद्युत विभागाकडून अंदाजपत्रके तत्काळ तयार २० दिवसाच्या आत यावल उपसा सिंचन योजनेचा तृतीय सुप्रमा अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांचेकडे सादर करावा असाआदेश अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर यांना दिले आहे.
यामुळेआता लवकरच चोपडा मतदारसंघातील साकळी, नावरे , विरावली,महेलखेडी,कोरपावली,दहिगाव,वाघोदे,चुंचाळे,गिरडगाव,वढोदे,दगडी,बोराडे,शिरसाड या गावातील ४६१९.१३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे .
तसेच निम्न तापी पाडळसरे प्रकल्पा अंतर्गत उपसासिंचन योजनेतुन चोपडा तालुक्यातील फक्त २५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ही सिंचन क्षमता १०,००० हेक्टर पर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी बैठकीत केली यावेळी मंत्रीमहोदयानी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
आदिवासी बांधवांसाठी प्रस्तावित ल. पा. प्रकल्प लंगडाअंबा साठी एक विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी आ प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केली असता मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सकारात्मक कार्यवाही करणेबाबत आश्वासित केले.
या बैठकीसाठी यावल रावेरचे आ. अमोल दादा जावळे,मुख्य अभियंता मिलींद बोरकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील,अधिक्षक अभियंता गोकुळ महाजन, एस. आर. भोसले,कार्यकारी अभियंता वाय. एम.कडलग उप अभियंता कामेश पाटील,यांसह मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते