नरवाडे येथे चोरट्यांचा धुमाकुळ १० ते १२ क्विंटल मूग चोरी
*
चोपडा,दि.९(प्रतिनिधी) तालुक्यातील नरवाडे येथील शेतकऱ्यांचा शेतातील गोदामाजवळील तार कंपाऊंड तोडून १०क्विंटल मुग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, नरवाडे येथील शेतकरी भगवान पांडुरंग धनगर यांचे गावालगत असलेल्या शेतातील गोडाऊन च्या बाहेर असलेल्या जाडीच्या कुंपणात मुंग सुकविण्यासाठी टाकलेला होता.ते जाडीचे कुंपण तोडून चोरट्यांनी रात्री च्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन आत प्रवेश करून शेतकऱ्याचा सुमारे दहा ते बारा किंटल मूग चोरून नेला.सदरील चोरीची घटना अतिशय गंभीर असून शेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.