राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन चोपडा कार्यालयात साजरा
चोपडा दि.११(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालयात चंद्रकला ताई पाटील सरपंच चहार्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, माजी जि. प सदस्य सुनिल पाटील (वाळकी), श्री प्रवीण भाई गुजराती,श्री परेश देशमुख, श्री मिलिंद सोनवणे, नोमान काझी, तुकाराम बापु पाटील, जियोद्दीन काझी, सनी सचदेव, राजेंद्र धनगर,साळुंखे गुरुजी, दानिश शेख व ईतर उपस्थित होते.