वर्ल्ड व्हिजनतर्फे धरणगावी बाल श्रम रोखथाम अभियानास प्रारंभ

 

वर्ल्ड व्हिजनतर्फे धरणगावी बाल श्रम रोखथाम अभियानास प्रारंभ 

धरणगाव दि.१३(प्रतिनिधी): बाल श्रम रोखथाम अभियान आज दिनांक १२ जून २०२५ रोजी बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते बालकामगार थांबविणे अभियानास सुरवात करण्यात आली.वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव ,जिल्हा महिला व बालकल्याण व बाल स्वरक्षण विभाग जळगांव तसेच तहसील कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  बाल कामगार थांबविणे अभियानास आरंभ धरणगाव येथे करण्यात आला असून हे अभियान संपूर्ण सप्तहा भर 22 गावात जनजागृती करण्यात येईल. 

या अभियानास चे सुरवात धरणगाव तालुक्याचे तहसीलदार श्री महेंद्र सुर्यवंशी सर , गटविकास अधिकारी श्री वानखेडे सर, गटशिक्षण अधिकारी भावना भोसले मॅडम तसेच चाईल्ड लाइन चे श्री कुणाल शुक्ला सर  व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी केले व  बाल गटाचे पदा अधिकारी यांनी केला त्याच प्रमाणे या वेळेस पोस्टर स्टॅन्डडी व रॅली काडून उदघाटन करण्यात आले व सर्वानी शपथ घेतली व नारे लावले "बंद करा बंद करा बाल मजूरी बंद करा" धरणगाव तालुक्याचे तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी सर  यांनी मार्गदर्शन केले व या वर्ल्ड व्हीजन इंडिया सस्था चे कौतुक केले बाल कामगार अभियान ह्या मोहिमेला प्राधान्य व सहमती दिले व जे ठेकेदार मुलांचे बाल श्रम साठी वापर करतात त्यांच्या वर शासन करवाई करेल वेळेस  कसे जिल्हा बाल हे सविस्तर माहिती दिली . तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी राबविण्यात येणारे बाल श्रम रोखथाम अभियानाची पुढील आराखड़ा दिला व कसे बाल कामगार थांबऊ शकतो व आपली जबाबदारी कसे पुढे नेऊ शकतो याची सविस्तर मार्ग दर्शन केले. तसेच श्री कुणाल शुक्ला सर यांनी १०९८ या क्रमांकाचे काय काम आहे या बद्दल मागदर्शन केले. कार्यक्रमासाठी धरणगाव तालुक्याचे 22 गावतून व ५० बाल गटा तील मुख्य प्रतिनिधि म्हणुन 100 मुले व बाल सरक्षण समिति चे सभासद उपस्थित होते.

 तसेच या कार्यक्रमाला व्हिजन इंडिया धरणगाव कर्मचारी रतिलाल वळवी,स्वयंम सेवक जितेन पाटील ,वैष्णवी पाटील  व आरती पाटील आधी उपस्तिथि होते व कार्यक्रमाचे संचालन अंकिता मेश्राम यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने