आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती ,नगरपालिका निवडणुकीसाठी गावा गावात कामाला लागा आ.प्रा.चंद्रकांत सोनवणेंचे कार्यकर्त्यांना फर्मान
चोपडादि.१७(प्रतिनिधी) येथील बोथरा मंगल कार्यालयात आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती , नगरपालिका निवडणुका व संघटनात्मक बांधणी ,सदस्य नोंदणी करणे संदर्भात चोपडा व यावल तालुका शिवसेना पक्षाची महत्वाची बैठक आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना पुढे येऊ घातलेल्या निवडणूका व शिवसेना पक्ष संघटनात्मक सदस्य नोंदणी विषयी मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार सौ. लताताई सोनवणे, नरेंद्र पाटील सभापती कृ.उ.बा चोपडा, बबलु कोळी उप सभापती कृ.उ.बा यावल, मुन्ना पाटील माजी सभापती कृ.बा.यावल, सुभाष आप्पा साळुंखे माजी जिल्हा परिषद सदस्य ,माणिक बापु महाजन मा.उप.सभापती प.स, प्रताप अण्णा पाटील, प्रकाश दादा रजाळे, भबुत आण्णा चौधरी ,रावसाहेब पाटील संचालक ,गोपाल पाटील संचालक, अँडो.शिवराज पाटील संचालक, सुर्यभान पाटील यावल कृ.उ.बा संचालक ,विजय पाटील संचालक ,किरण देवराज संचालक, सौ कल्पनाताई पाटील संचालक, सौ मंगलाताई पाटील, हरिष पाटील मा.जि प सदस्य, एम व्ही पाटील माजी उप सभापती प स ,नामदेव पाटील ,विकास पाटील ,माजी उपनगराध्यक्ष, राजेंद्र पाटील माजी शिवसेना तालुकाप्रमुख, किशोर चौधरी माजी उपनगराध्यक्ष ,मेहमुद बागवान माजी उपनगराध्यक्ष ,हनीफ सत्तार, प्रकाश दादा राजपूत माजी नगरसेवक, संध्याताई महाजन मा.नगरसेविका, महेंद्र धनगर मा नगरसेवक ,सौ अनिता ताई शिरसाठ ,सौ भावना ताई महाजन ,सौ भारती महाजन, सौ शितल देवराज ,दिपक चौधरी ,गोपाल चौधरी राजेंद्र पाटील सर, भरत चौधरी सर ,किरण पाटील सागर ओतारी, कैलास बाविस्कर , सुनिल बरडिया,प्रविण देशमुख,विपीन जैन,निवृत्ती पाटील, प्रविण जैन,रमजान तडवी,धिरज गुजराथी,नंदू गवळी ,दिव्यांक सावंत,गोलु मराठे, महेंद्र पाटील,भरत साळुंखे व तालुका भरातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.