अडावद येथे महाजन विद्यालयात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व फुगे देऊन केला प्रवेशोत्सव साजरा
अडावद ता. चोपडा दि.१८(प्रतिनिधी) शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अडावद येथील येथील शामराव येसो महाजन विद्यालयात व आदर्श प्राथमिक शाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी जोरदार स्वागत करण्यात आले.
१६ रोजी सकाळी ८ वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळेत तसेच दुपारी १२ वाजता शामराव येसो महाजन विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन व सचिव रमेश पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याला गेट मध्ये प्रवेश करतांना गुलाब पुष्प देण्यात आले. पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांना दप्तर, गणवेश पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके देण्यात आली. पहिल्या दिवशी कोरे करकरीत पुस्तके हातात पडल्यावर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले.
यावेळी प्रत्येक वर्गखोल्या केळीच्या खांब, पताकांनी सजविण्यात आले होते. या कार्यक्रमात शामराव येसो महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.के. पिंपरे, उपशिक्षक एन. ए. महाजन, व्हि. एम. महाजन, एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन उपस्थित होते. तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन ,वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार ग्रामस्थ ,पालक वर्ग ,विद्यार्थी उपस्थित होते.