हातेड - बुधगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य.. पाऊस पडताच बसेस बंद होण्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
चोपडा,दि.१९ :- (प्रतिनिधी) :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अनं अश्यातच छत्रपती संभाजी नगर ते इंदौर या राष्ट्रीय महामार्ग चे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र या रस्त्यावर एका साईटने जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवले आहे. म्हणून या रस्त्यावर अवजड वाहने व एसटी बसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद करून ठेवली आहे . यामुळे सध्या शाळा,कॉलेज, महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नाही. म्हणून विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान सुध्दा होत आहे. याला जबाबदार कोण? असा गावकऱ्यांनी केला आहे.
एसटी बसेस सुरू व्हाव्यात यासाठी अनवर्दे येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी चिटणीस महेश बोरसे यांनी चोपडा आगाराला एक निवेदन दिले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी चोपडा आगारातून लवकरात लवकर एसटी बसेस सुरू करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे.