संजय गांधी व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी ..७ गावांना वेगवेगळ्या तारखेस DBT शिबीराचे आयोजन..

 

संजय गांधी व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी ..७ गावांना वेगवेगळ्या तारखेस  DBT शिबीराचे आयोजन


चोपडा दि.२९(प्रतिनिधी)संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर खालील नमुद केलेल्या तक्त्यातील दिनांकानुसार मंडळ भागासाठी आयोजित करण्यात येत आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे अदयाप DBT आधारकार्ड प्रमाणिकरण झालेले नाही त्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना पुरविण्यात आलेली आहे. तरी सदर लाभार्थ्यांनी संबंधित मंडळासाठी निश्चित केलेल्या दिनांकास सकाळी 8.00 वाजता शिबीरामध्ये आधारकार्ड झेरॉक्स व आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबरसह न चुकता उपस्थित राहावे. सदर शिबीरात मंडळातील समाविष्ट गावांमधील लाभार्थ्यांचे DBT आधारकार्ड प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. 

सदर DBT शिबीराचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. 

अ.क्र. मंडळाचे नांव शिबीराचा दिनांक शिबीराचे ठिकाण

1 अडावद 30/05/2025 नुतन ज्ञान मंदीर हायस्कुल, अडावद

2 चहार्डी 02/06/2025 राममंदीर, चहार्डी

3 धानोरा 03/06/2025 तलाठी सजा, धानोरा

4 हातेड 05/06/2025 स्वामी नारायण मंदीर, कुसुंबा

5 आडगांव 06/06/2025 ग्रामपंचायत कार्यालय, आडगांव

6 लासूर 07/06/2025 तलाठी सजा, लासूर

7 गोरगावले बु. 09/06/2025 राममंदीर, गोरगावले बु.œ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने