आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत वैजापूरला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्साहात

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत वैजापूरला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्साहात


चोपडा दि.२६(प्रतिनिधी)आज दिनांक 26 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आ.प्रा.श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील वैजापूर आदिवासी मंडळ व परिसरात आयोजित करण्यात आले होते.यावेळी परिसरातील तसेच अन्य नागरिक व ग्रामस्थ खातेदार यांनी अडचणी व समस्या मांडल्यात  तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत  राबविण्यात येणारे उपक्रम,योजनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.   

या कार्यक्रमाअंतर्गत  शासनाचे विविध उपक्रम व योजना मिळून एकूण 238 लाभार्थ्यांना लाभ मिळाला.तसेच यावेळी उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून ताकीद द्यावी. अशी सुचना आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी प्रसंगी नितीन मुंडावरे (उपविभागीय अधिकारी), अरुण पवार प्रकल्प अधिकारी,अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी,भाऊसाहेब थोरात तहसीलदार,अनिल विसावे गटविकास अधिकारी,डॉ प्रदीप लासुरकर तालुका आरोग्य अधिकारी,दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी,वीरेंद्र राजपूत उपविभागीय अभियंता,विलेश ठाकरे आरएफओ, बी के थोरात, आर एफओ,ताराचंद राठोड,विकास पाटील,प्रताप पावरा,कैलास बाविस्कर,पिंटू पावरा,संतोष महाजन,प्रल्हाद तडवी,दत्ता पावरा,सौ विद्याताई बारेला,नकुड पावरा,नाना महाराज,बबलू बारेला,प्रेमा बारेला,अरविंद बारेला,अन्नू ठाकूर,संजय कोळी,नंदलाल बारेला,नामदेव पवार व तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने