एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश..कला शाखेतून अर्चना पाटील, विज्ञान किरण सपकाळे तर वाणिज्य शाखेतून कृष्णा अग्रवाल सर्व प्रथम

 एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश..कला शाखेतून अर्चना पाटील, विज्ञान किरण सपकाळे तर वाणिज्य शाखेतून कृष्णा अग्रवाल सर्व प्रथम 

चोपडा,दि.५( प्रतिनिधी )येथील प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत उत्तम गुण संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या कला विभागाचा निकाल 97.14 टक्के,वाणिज्य आणि विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शाखेचा निकाल 83.33 टक्के लागला आहे. 

      कला विभागातील विद्यार्थिनी पाटील अर्चना सुनील हीने 84.50% गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे तर पवार भाविका प्रकाश ७८.१७ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि पांडव नितेश दीपक याने 76.50 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य विभागात अग्रवाल कृष्णा हरीश याने ८२.८३ टक्के गुण मिळवत प्रथम, बाविस्कर सुरेश किशोर याने 77.33 टक्के गुण मिळवत द्वितीय तर पाटील भाग्यश्री सोपान हीने 74.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेत कुमारी किरण राजाराम सपकाळे हिने 87.50 टक्के  गुण मिळवत प्रथम क्रमांक पाटील संकेत निलेश याने 87.17 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर पाटील चैतन्य सुनील याने 87 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शाखेत सोनार दुर्गादास बाबुलाल या ऑटोमोबाईल शाखेच्या विद्यार्थ्याने 66.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

     विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष मा.शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष मा.विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन मा.राजाभाई मयूर, सचिव मा.माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य  मा.चंद्रहासभाई गुजराथी , मा.भूपेंद्रभाई गुजराथी, मा.रमेशकाका जैन तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी ,उपमुख्याध्यापक पी डी पाटील, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एम डब्ल्यू पाटील, ए एन भट, , समन्वयक गोविंद गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने