पंकज विद्यालयाचा रोहन संजय देशमुख 90.33% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

 पंकज विद्यालयाचा रोहन संजय देशमुख 90.33% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

चोपडा,दि.५(प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्य मिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षा मार्च 2025 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 99.39% व कला शाखेचा निकाल 93.22% लागला. विद्यालयाने या वर्षी निकालात दैदिप्यमान यश गाठून यशाची परंपरा कायम राखली आहे. सदर परीक्षेत रोहन देशमुख याने 90.33% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.विज्ञान शाखेत आदित्य कांतीलाल पाटील 89.50% द्वितीय , नचिकेत अरविंद पाटील 87.67% तृतीय,

युक्ती जगदीश पाठक 86.50 %, प्रियानी रविंद्र महाजन 86.17% या सर्वच विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले आहे. इयत्ता 12 वी च्या सायन्स शाखेत 75% पेक्षा गुण प्राप्त करणारे 78 विद्यार्थी आहेत, 70% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 114 विद्यार्थी आहेत. 

कला शाखेतून चंदना मनोज नेटके हिने 86.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कल्याणी आधार कोळी 75.33% द्वितीय , निकिता गजानन कोळी 75.33% द्वितीय , प्रियंका समाधान कोळी 75.00% तृतीय  या विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले. सर्व यशस्वी  विद्यार्थी मित्रांना मुख्याध्यापक व्ही.आर पाटील, एन आर वाघ, दिवाकर बाविस्कर, वैशाली चौधरी, योगराज रायसिंग, अजय सैदाणे, जितेंद्र महाजन, सौरभ कुलकर्णी, संजय भादले, आशिका पाटील, गायत्री धनगर, भुवनेश्वरी निनायदे, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या नेत्रदिपक निकालाबद्दल  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , संचालक पंकजभैया बोरोले, सर्व विभाग प्रमुख व मुख्याध्यापक व्ही.आर पाटील यांनी सर्व विद्यार्थी मित्र पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने