विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे १२वी परीक्षेत घवघवीत यश
चोपडा,दि.५(प्रतिनिधी) - येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकार दास अग्रवाल कॉलेजच्या बारावी परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षाचा निकाल 100℅ लागला आहे
सायन्स विभागाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
1 शिंदे भूमिका प्रदीप 89.33%प्रथम,
2 चौधरी प्राजक्ता अतुल 86.67% द्वितीय,
2 काबरा प्रिया रितेश 86.67%द्वितीय,
3 सोनी मधुश्री प्रशांत 85.33%, तृतीय क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर हेमांगी अहिरे हिने चौथ्या स्थानावर आणि मानस वि.हरताळकर याने पाचव्या क्रमांकावर बाजी मारली आहे.
तसेच कॉमर्स विभागाचे
1 बाविस्कर प्राजक्ता महेंद्र 84.33%
2 लोहार नेहा सतीश 81.83%
3 परदेशी सिद्धेश्वर किशोर 79.83% तृतीय
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्री विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.श्री.विजय पोतदार, उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.श्री.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.श्री विनीत हरताळकर , माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.नरेंद्र भावे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.पी जी पाटील,इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ. सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आशा चित्ते ,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी भावे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यशस्वी विदयार्थ्यांनाप्रा.सौ गौरी शुक्ला , प्रा.श्री.दीपक पाटील, प्रा.श्री.संजय गवळी, प्रा.श्री.विक्की शर्मा,प्रा.श्री.कुणाल सोनार, प्रा.श्री.प्रवीण पाटील, प्रा.श्री.घश्याम पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद परिवारातील सर्व विभागतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या