कला, शास्त्र आणि वाणिज्य जुनिअर महाविद्यालयाचा बारावी परीक्षेत दैदिप्यमान निकालाची यशस्वी परंपरा कायम

 कला, शास्त्र आणि वाणिज्य जुनिअर महाविद्यालयाचा  बारावी परीक्षेत दैदिप्यमान निकालाची यशस्वी परंपरा कायम 

चोपडा दि.५(प्रतिनिधी)येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या कै. माजी आमदार  दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कला, शास्त्र आणि वाणिज्य जुनिअर महाविद्यालयाची बारावी च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवलेली आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. 

त्यात विज्ञान विभागात प्रतीक्षा ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थिनींनी 600 पैकी 537 गुण मिळवून (89.50% ) प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक साक्षी महेंद्र चौधरी यांनी 600 पैकी 535 गुण मिळवत 89.17% गुण मिळवलेले आहेत. तसेच प्राची राजेंद्र पवार हिलाही 89.17% गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि मनस्वी भीमराव पाटील या विद्यार्थिनीने 600 पैकी 531 गुण मिळवत 88.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. 

कला शाखेमध्ये स्वरा प्रशांत अनवर्देकर या विद्यार्थिनीने 600 पैकी 529 गुण मिळवून 88.17% गुण मिळवत  प्रथम क्रमांक प्राप्त केला असून द्वितीय क्रमांक राधिका प्रियदर्शन कोळी या विद्यार्थिनीने 600 पैकी 484 गुण मिळवून (80.67% ) प्राप्त केलेला आहे तर तृतीय क्रमांक संजना महेंद्र अहिरे या विद्यार्थिनीने 600 पैकी 457 गुण मिळवत 76.17% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. 

तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक अश्विनी प्रल्हाद कुमावत या विद्यार्थिनीने 600 पैकी 546 गुण मिळवून 91 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक रुचिता सोमनाथ पाटील या विद्यार्थिनीने 600 पैकी 534 गुण मिळवत 89.00 टक्के गुण मिळवलेले आहेत. तर तृतीय क्रमांक दामिनी गुलाब पाटील या विद्यार्थिनीने 600 पैकी 533 गुण मिळवून 88.83% गुण मिळवलेले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील ,प्राचार्य डॉ. डी . ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.आर. एम. बागुल, उपप्राचार्य डॉ. अनिल सूर्यवंशी जुनियर विभागाचे प्राचार्य प्रा.एस. पी.पाटील, पर्यवेक्षक व्हि .एन. बोरसे यांचे सह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने