जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी- उद्योग मंत्री उदय सामंत
♦️ आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीवर उद्योग मंत्र्यांचे निर्देश..चहार्डी एमआयडीसी विकासासाठी पायाभुत सुविधेचा प्रस्ताव येत्या आठवड्यात होणार मंजुर ♦️पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील जळगावजिल्ह्यातील शिष्टमंडळाची भेट
मुंबई, दि. २८ : जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळांनी उद्योगमंत्री श्री.सामंत यांची भेट घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत होणार असल्याची तत्वतः मान्यता उद्योगमंत्री यांनी दिली. बैठकीस एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात उद्योग आले पाहिजेत, यासाठी उद्योजकांशी बोलून त्यांना जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याबाबत विनंती करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यात मेगा प्रकल्प किंवा अल्ट्रा मेगा प्रकल्प आल्यास प्रस्तावित औद्योगिक धोरणानुसार सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे ५०० कोटी पेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सुद्धा एमएसएमई अंतर्गत लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथे आज राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री ना.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थित जळगांव महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या D + झोनमध्ये समावेश करणेसाठीची महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी जळगांव जिल्ह्यातील आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर अप्पा पाटील,आ. राजू मामा भोळे,आ. चंद्रकांत पाटील ,आ. अनिल पाटील,आ.अमोल पाटील,आ. मंगेश चव्हाण,आ.अमोल जावळे यांच्या सह सर्व आमदार, व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होतेयावेळी बैठकीत बोलताना आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचेसह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनीनी जळगाव जिल्ह्याला विदभऀ ,मराठवाड्याप्रमाणे तसेच धुळे ,नंदुरबार जिल्हयाप्रमाणे उद्योजकांना सवलती मिळाव्यात यासाठी जळगाव जिल्हाचा डी+:झोन मध्ये समावेश करावा अशी मागणी केली.यावेळी बोलताना ना. उदय सामंत यांनी जळगाव जिल्ह्याचा लवकरच डी + झोनमध्ये समावेश करण्यात येईलतसेच या बैठकीत चहाडीऀ औद्योगिक वसाहत विकसीत करण्यासाठी पायाभुत सुविधेचा प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबीत असल्याचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी निदशऀनास आणताच ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश दिले. यामुळे चोपडा तालुक्याच्या औद्योगिक विकासात भर पडणार आहे.