साहित्यिक राजेंद्र पारे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

 

साहित्यिक राजेंद्र पारे  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित


चोपडा दि.२१(प्रतिनिधी) : समता उत्कर्ष समिती शिरपूर जिल्हा धुळे आयोजित  'काकासाहेब बैसाणे जीवन गौरव पुरस्कार 2025' मोठया सन्मानाने चोपडा येथील साहित्यिक राजेंद्र पारे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
           राजेंद्र पारे हे जिप शाळा गणपूर येथे कार्यरत आहेत. त्यांना राज्यशासनाचा शिक्षक पुरस्कार मिळाला असून त्यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मागचं दार, ठिगळ अन् टाके,बुद्धा इज स्माईलिंग,निब्बान, धावपट्टीवरचा अनोखा प्रवास,आपले संविधान आपला सन्मान इत्यादी साहित्य प्रकाशित आहे. ''आकांक्षा' ही कथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे बी.ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
         सिटी प्राईड उत्सवच्या सभागृह शिरपूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. तुषार बैसाणे लिखित बाप माय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
        कार्यक्रमात भाऊसाहेब डॉ. तुषार रंधे, आशाताई रंधे, पिंटूभाऊ शिरसाठ, भदंत आनंद, डॉ. दीपाली सोसे, डॉ. माधवराव कदम, युवराज माळी, डॉ. फुला बागूल, डॉ. सतीश मस्के, प्राचार्य सारिकाताई रंधे, आशाताई बैसाणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. तुषार बैसाणे,नगरसेवक पिंटू शिरसाठ, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे, आशाताई बैसाणे, पनीराज बैसाणे, संजय जाधव, जितेंद्र भदाणे, यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे तर आभार पनीराज बैसाणे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने