चुंचाळे येथील सेवानिवृत्त शिक्षक बी.जी.महाजन यांना "समाज रत्न पुरस्कार" प्रदान ..धुळ्यात झाला राष्ट्रीय परिषदेत गौरव

  चुंचाळे येथील सेवानिवृत्त शिक्षक बी.जी.महाजन यांना "समाज रत्न पुरस्कार" प्रदान ..धुळ्यात झाला राष्ट्रीय परिषदेत गौरव 


चोपडादि.२१ (वार्ताहर) धुळे येथील रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा "समाजरत्न पुरस्कार" चुंचाळे ता.चोपडा येथील बी जी महाजन नूतन माध्य. व उच्च माध्य.विद्यालय (सेवानिवृत्त शिक्षक) यांना धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील सभागृहात प्रदान करण्यात आला

श्री महाजन यांच्या शैक्षणिक सामाजिक पर्यावरण मृदा व जलसंवर्धन कार्याबद्दल या पूर्वीही त्यांना भारतीय कृषि अनुसंधान संस्था दिल्ली ( ICAR ) सोबत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पारंपारिक वाणसंवर्धन विशेष कार्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील पहिला पथदर्शक शेतीतील मोहवृक्ष लागवड प्रजाती संशोधन व संवर्धनाच्या प्रकल्प उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडोग्लोबल फाउंडेशन धुळे संस्थेचा उद्देश समाजातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कृषी व आरोग्य क्षेत्रातील इनोव्हेटिव्ह (उदयन्मुख) कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीची निवड संस्थेच्या निवड समितीच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. या आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद कार्यक्रमात 50 शोधनिबंधाचे सादरीकरण प्राध्यापक संशोधक व अभ्यासक यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला होता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील रियल इंडो ग्लोबलव्हिजनचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात प्रा.डॉ.जितेंद्र तलवारे लिखित "डिजिटल अर्थव्यवस्था" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दीपक पाटील डॉ. भाऊसाहेब देसले यांनी केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉ.रवींद्र वाघ यांनी करून आभाराचे काम प्रा.डॉ.मोहन पावरा यांनी केले श्री बी जी महाजन यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल स्नेहीजणांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने