"यावल पॅटर्न" चा गौरवार्थ आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचा सत्कार
चोपडा दि.,३१( प्रतिनिधी) दि.३०/५/२५ आदिवासी क्षेत्र विकासाच्या राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रम संदर्भात शासनाच्या १०० दिवशीय कृती आराखड्याचे आयोजीत उपक्रमात एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षमतेने व समर्पण केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच राज्यातील एकूण 30 प्रकल्प कार्यालयातून प्रथम क्रमांकाने राज्यात यश संपादनाचे सारथी अरुण पवार यांचा सत्कार चोपडा तालुक्यातील तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण (माविम गट) संचलित आदिवासी महिला गटांच्या अध्यक्षांनी यावल येथे प्रकल्प कार्यालयात येऊन सत्कार केला.
याप्रसंगी १)भूमिपुत्र अनुसूचित क्षेत्र आदिवासी महिला विकास गट कृष्णापुर. २)नारीशक्ती अनुसूचित आदिवासी महिला विकास गट. ३) द्रौपदीमुर्म अनुसूचित क्षेत्र आदिवासी महिला विकास गट कृष्णापुर/चुंचाळे या गटांच्या अध्यक्षां बायलाबाई शंकर बारेला. मंदाबाई साहेबराव बारेला वनिता प्रदीप बारेला. यांनी सत्काराचे आयोजन केले या सत्कार समारोह प्रसंगी उपस्थित आदिवासी प्रकल्प उपसंचालक माहूरकर कार्यालय अधीक्षक विलास पाटील तसेच उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे चार्टर अकाउंटंट वीरेंद्र छाजेड. भूमिपुत्र आदिवासी महिला अभिनव विकास फाउंडेशन मुख्य प्रवर्तक बी जी महाजन सर चुंचाळे उपस्थित होते.