राष्ट्रीय फलोत्पादन क्षेत्रातला "उद्यानरत्न अवॉर्ड " जळगाव जिल्ह्याचे " बनानाकिंग "भागवत महाजन यांना प्रदान

 राष्ट्रीय फलोत्पादन क्षेत्रातला "उद्यानरत्न अवॉर्ड " जळगाव जिल्ह्याचे " बनानाकिंग "भागवत महाजन यांना प्रदान 

♦️ कृषी विद्यापीठ बिहार भागलपुर येथे आयोजित सोहळ्यात झाला सन्मान 


चोपडा दि.३१( प्रतिनिधी) ता.चोपडा दि.३०/५/२०२५. स्व. अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन (ASM) बिहार एग्रीकल्चर यूनिवर्सिटी भागलपुर व भारतीय कृषी परिषद उद्यानसंचालनालय दिल्ली संचलित आंध्र प्रदेश कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीयस्तराचा फलोत्पादन क्षेत्रातला उल्लेखनीय कार्याबद्दल उद्यानरत्न अवॉर्ड 2025 पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे "बनानाकिंग" भागवत काशिनाथ महाजन गोरगावले ता. चोपडा यांना भारतीय कृषी परिषद उद्यान संचनालय दिल्ली संचालक डॉ.एस पी सिंग आंध्रप्रदेश कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ.पाठक ASM फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बिमलासिंग यांच्या हस्ते बिहार एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी भागलपुर येथील सभागृहात  गौरविण्यात आले.

 भागवत महाजन यांनी केळी पिका संदर्भात केलेले अभ्यासपूर्ण संशोधन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग अवलंबनातून दर्जेदार केळी उत्पादनाचा अनुभव व परिसरातील शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शन या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विद्यापीठांनी घेऊन त्यांची निवड करून त्यांना सन्मानित केले.या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातून जैन इरिगेशन कंपनीचे केळी तज्ञ डॉ.के बी पाटील. मोहन चौधरी.शुभम पाटील.प्रशांत राणे कुंभारखेडा शेतकरी प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते. महाजन यांना मिळालेल्या राष्ट्रीय स्तराच्या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने