चोपडा ग्रामिण पोलिसांनी पाळधीच्या दोघांना ठोकल्या बेळ्या..७ किलो८५५ग्रम वजनाचा गांजा जप्त
चोपडा,दि.29(प्रतिनिधी) तालुक्यातील गलंगी येथे बस स्थानकावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पाळधी येथील दोन जणांना 7 किलो 855 ग्रॅम वजनाचा हिरवा गांजासह रंगेहात पकडून जेलची हवा दाखवली आहे .आरोपीतांकडून 2 लाख 48 हजार 810 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नशा युक्त पदार्थ विकणाऱ्यांना चोपडा पोलीस चांगलीच अद्दल घडवत असल्याने नागरिकातून पोलिसांचे कार्याबद्दल जोरदार कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर गलंगी गावी पोलीस चौकी समोरील रोडवर गांजा अवैधरित्या विक्रीसाठी येत असल्याची कानभून लागल्यावर सापळा रचत शिव दिनेश भोसले (वय २२ वर्षे )व सुनील यशवंत नन्नवरे (वय २०वर्ष )दोघे रा. पाळधी ता. धरणगाव यांना पकडले असता त्यांच्याकडील पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणी मध्ये फुल बियांच्या पाकळी असलेला हिरवट रंगाचा ओलसर गांजा सात किलो 885 ग्रॅम वजनाचा मिळून आला. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यात 75 हजार रुपये किमतीची काड्या रंगाची स्प्लेंडर (क्रमांक एम एच 19 ईएच 08 54) मोबाईल व गुंगीकारक असलेला गांजा अंदाजे एक लाख 72 हजार 810 रुपये किंमतीचा असा एकूण २ लाख 48 हजार 810 रुपये किमतीच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे .
याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीतांविरुध्द सीसी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर 170 / 2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवयापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 -20(ब) व 22 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर ह्या करीत आहेत