बापरे बाप मजुरांचे करतात हाल..!डांबून ठेवलेल्या चोपडयाच्या 11 ऊसतोड मजुरांची सुटका !

 बापरे बाप मजुरांचे करतात हाल..!डांबून ठेवलेल्या चोपडयाच्या 11 ऊसतोड मजुरांची सुटका !

♦️सोलापूरमधील प्रकार : जन सहास फॉउंडेशन च्या हाकेला प्रशासनाची दाद


चोपडा दि.2(प्रतिनिधी): ऊसतोडीसाठी काम आहे, असे सांगून सोलापूर जिल्ह्यात नेलेल्या चोपडयाच्या  रामपुरा भागातील 11 मजुरांना अन्यच काम देत त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मजुरीची रक्कम न देता या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना जन साहस संस्थेने प्रशासनाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार जळगाव आणि सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने सुत्रे हलवित या  मजुरांना सुखरुपपणे घरी पोहचते केले आहे.

रामपूरा (चोपडा गाव) या गावातील 11 मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी पंढरपूर तालुक्यात नेण्यात आले होते. कित्येक दिवसांपासून मजुरांना पंढरपूरसह अन्य गावांमध्ये ऊसतोड व  अन्य  बांधकाम कामासाठी जुंपण्यात आले. मोबदला मागितल्यावर मात्र धमकावण्यास सुरुवात केली आणि नजरेखाली ठेवत त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. या प्रवासात एकच मालकांकडे वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले असताना त्यानुसार मंगलबाई प्रकाश भिलं व सुनंदा हिम्मत भिलं या मजुरांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी माहिती जन साहस संस्थेचे कामगार हेल्पलाईन ला  कळविली. तेव्हा जन साहस संस्थेने पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांनी RDC साहेब यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोलापूर व पंढरपूर प्रशासनाशी संपर्क सुरु झाला. सोलापूर जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद  यांनी कारवाईला सुरुवात केली. महसुल विभाग कामगार विभाग पोलिस अधिकाऱ्यांसोबत जळगांव जन साहस संस्थेचे जिल्हा समन्वयक निलेश शिंदे, राज्य कामगार सुरक्षा समन्वयक सय्यद रुबीना, ॲड.सी. एस. परमार. जळगांव जन साहस संस्थेचे   क्षेत्र अधिकारी हितेंद्र माळी व सोनम केदार धाराशिव जन साहस संस्थेचे क्षेत्र अधिकारी उमा गायकवाड व विक्रम कल्याणकर यांनी मजुरांना गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले व डी एम.  कुमार आशीर्वाद  यांना भेटलो आणि त्यांनी पंढरपूरच्या एस डी एम  यांच्या सोबत फोनवरून बोलून त्यांना बंधपत्रित कामगार कायद्यानुसार कारवाई करण्याचे आणि बचाव पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.व पुढे रेड अँड रेस्कु प्रोसेस करण्यात आली व कामगारांना पंढरपूर SDM कार्यलय मध्ये सुखरूप आणले पंचनाम व जबाब घेऊन बंधपत्रित कामगार कायद्यानुसार 6 कामगारांना रिलीज सर्टिफिकेट देण्यात आलं आणि  सुरक्षित व सुखरूप पणे त्याना जळगांव जिल्हा अधिकारी  व RDC  व जळगांव विधी सेवा प्रधिकारण येथे  जळगाव जन साहस टीम यांच्या सोबत भेट देऊन कामगारांच्या पुनर्वसन शासकीय योजनेबद्दल चर्चा करण्यात आली व यांच्या गावी सुखरूप पोहचवण्यात आले .


 सुटका करण्यात आलेले रामपुरा ता.चोपडा येथील  मजुर पुढीलप्रमाणे 1)रूपाबाई ब्रिजलाल भिलं -38 वर्ष 

2) स्वप्नील ब्रिजलाल भिलं - 17 वर्ष 

3) विक्की ब्रिजलाल भिलं - 15 वर्ष 

4) सुरेश रतन भिलं - 30 वर्ष

5)उषाबाई सुरेश भिलं - 25 वर्ष

6) कुणाल सुरेश भिलं - 07 वर्ष  

7) शिव सुरेश भिलं - 4 वर्ष 

8) ऋतिका सुरेश भिलं -2 वर्ष  

9)पिरण रतन भिलं -  26 वर्ष  

10) गणेश मानसिंग भिलं -22 वर्ष  

11)कविता गणेश भिलं -20 वर्ष   हे मजूर सुखरुपपणे घरी परतले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने