बेसबॉल स्पर्धेत दिव्यतेज पाटील चे घवघवीत यश
चोपडा दि.3(प्रतिनिधी)नुकत्याच दिल्ली येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुला मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल मिळविले महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात चोपडा येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी दिव्यतेज अतुल पाटील याचा सहभाग होता. चोपडा तालुक्याच्या इतिहासात राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणारा दिव्यतेज हा प्रथम खेळाडू ठरला आहे.
त्याला चाळीसगाव येथील बेसबॉल प्रशिक्षक श्री अजय देशमुख, श्री जे पी वाघ तसेच वडील श्री अतुल रामराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्याच्या या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील, सचिव डॉ. सौ स्मिता पाटील, सहसचिव डॉ. डी. ए. सूर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता न्याती तसेच चोपडा कॉलेज व ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले.