सत्रासेन माध्यमिक शिक्षक आश्रम शाळेचे शिक्षक भालचंद्र पवार यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस

सत्रासेन माध्यमिक शिक्षक आश्रम शाळेचे शिक्षक भालचंद्र पवार यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस

चोपडा दि.६(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन व डायट, जळगांव आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये अकरावी व बारावी गटातून जिल्हास्तर (जीवशास्त्र विषयात ) प्रथम क्रमांकाचे बक्षीस आज जळगांव येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील व मान्यवरांच्या हस्ते  श्री भालचंद्र पवार व( उच्च माध्यमिक शिक्षक आश्रम शाळा, सत्रासेन ) यांना प्रदान करण्यात आले.

   कार्यक्रमास ना.श्री संजय सावकारे ,,  आ.श्री किशोर आप्पा पाटील, जिल्ह्याच्या सीईओ मीनल करणवाल मॅडम,  , माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम, जळगाव डाएट चे प्राचार्य श्री झोपे सर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नखाते हे उपस्थितीत होते.

 श्री रवींद्र रायसिंग भादले अध्यक्ष धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ सत्रासेन, ज्ञानेश्वर रायसिंग भादले सचिव व संस्थेतील पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री बी एस पवार सर व परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने