ऍड संदीप पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या निरीक्षक पदी नियुक्ती

 ऍड संदीप पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या निरीक्षक पदी नियुक्ती

चोपडा दि.६(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाधक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.

    काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष बळकळीकरण व कार्याच्या आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ सदस्याची पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात येत आहे. या दृष्टीने काँग्रेसचे निष्ठावान, अनुभवी नेते माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेस निरीक्षक पदी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे सांगितलं आहे.

      ऍड संदीप पाटील यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.ऍड पाटील यांचे  नंदुरबार जिल्हा निरीक्षक पदी नियुक्तीचे जळगाव जिल्हातील काँग्रेस जनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या नंदुरबार जिल्हाचे निरीक्षक पदी नियुक्ती होणे ही फार मोठी गोष्ट आहे. पक्षाने दिलेली निरीक्षक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी निष्ठेने पार पाडेल.तसेच काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व विकासासाठी नेहमी तत्पर राहणार असल्याचे ऍड संदीप पाटील यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने