चोपडा तालुका सकल जैन समाजाच्या वतीने उद्या विश्वशांती नवकार दिवसाचे आयोजन

  चोपडा तालुका सकल जैन समाजाच्या वतीने उद्या विश्वशांती नवकार दिवसाचे आयोजन

चोपडा,दि.९(प्रतिनिधी) तालुक्याचे सकल जैन समाज यांचे वतीने आयोजित विश्वशांती नवकार दिवस 9 एप्रिल 2025 रोजी साजरा करण्याचे योजिले असून  त्यानिमित्ताने नवकार महामंत्रचे जप सकाळी आठ वाजून एक मिनिट ते नऊ वाजून 36 मिनिटापर्यंत करण्यात येणार आहे कार्यक्रमाला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, आमदार चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, व सर्व शासकीय अधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित राहणार आहेत 

जुना शिरपूर रोड येथील विश्वनाथ जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी येथील कंपाउंड मध्ये  नवकार जप चे आयोजन करण्यात आले असून जैन समाजाचे आबालवॄद्ध सहकुटुंब उपस्थित राहतील कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे पदाधिकारी व कमिटी सदस्य चेतन टाटीया, दर्शन देशलहरा, पवन जैन, सौरभ जैन, मयुरेश जैन, राजस जैन, दीपक राखेचा, विशाल जैन, आदेश बरडीया, प्रवीण राखेचा आदी मेहनत घेत असून चोपडा वासियांना विश्वकल्याणासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने