चोपडा शहर उपजिविका कृती आराखडा समितीची बैठक
चोपडा,दि.९(प्रतिनिधी)- दिनदयाल जन आजीवका योजने अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक नगर परिषद सभागृहात मुख्याधिकारी राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक यांनी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्याबाबत मूलभूत बाबीचे उद्बोधन केले.सर्व शासकीय व अशासकिय संघटनांकडून जास्तीत जास्त गरजू लाभार्थींची माहिती मिळविण्यासाठी या बैठकिचे नियोजन करण्यात आले.
दिनदयाल जन आजीविका योजना पालिकास्तरावर देशभर राबविण्याचे केंद्रस्तरावर ठरविण्यात आले आहे.त्यानुसार पालिका पातळीवरील गरिबी निर्मूलन करण्याचे दृष्टीने वंचित घटकांचे जीवनमान उंचविण्यासाठी कोण कोणत्या योजना राबविता येतील.रोजगार,स्वंयरोजगार गरजूना कसा देता येईल.श्रम करणा-या मजूरांना कश्या जीवनावश्यक सुविधा देता येतील याबाबत या बैठकित चर्चा करण्यात आली.योजनेची व्यापकता विस्तीर्ण असल्याने अगोदर गरजूंचे सर्वेक्षण करुन शासनाच्या निर्देशांनुसार लाभार्थ्यांना प्रत्यक्षात सहाय्य करण्याची भुमिका मांडण्यात आली.
यावेळी प्रा.विनोद रायपुरे,श्रीकांत नेवे,प्रमोद डोंगर,जयदेव देशमुख,भुपेंद्र गुजराथी,हितेंद्र देशमुख,हुसेन पठाण,अश्विनी गुजराथी,महेश पाटील,वामनराव चौधरी,अतुल वाणी आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.बैठकिला उपमुख्याधिकारी संजय मिसर,सी.एल.सी.अध्यक्षा माधुरी चौधरी, मुकेश परदेशी,रवींद्र जाधव सर्वच शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी,पालिकेतील विभाग प्रमुख, मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते.बैठकीसाठी अरुण राजपुत,प्रवीण राजपुत आदिनी परिश्रम घेतले.

