कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत सुयश
वसई दि.6(प्रतिनिधी): वसई येथील रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी.ज्युनिअर कॉलेज ,जूचंद्र ता. वसई येथील इयत्ता आठवीतील भोस्कर ध्रुव देवेंद्र , कु. आडोळे श्रुती मिलिंद व कु. कोथे हेमांगी मनोज यांनी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ मध्ये यश संपादन करून शासकीय शिष्यवृत्ती मिळविली आहे. इयत्ता नववी ते बारावी पर्यंत त्यांना प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. या विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल त्यांचा सत्कार रयत शिक्षण संस्था ,रायगड विभाग, पनवेल चे सहाय्यक विभागीय अधिकारी तथा मुख्याध्यापक श्री विलासराव जगताप सर व सर्व शिक्षक वर्गाने केला.या परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एन.एम.एम.एस.परीक्षा विभाग प्रमुख सौ .वर्षा सोनावळे मॅडम तसेच सर्व विषय शिक्षकांचे स्थानिक शाळा समिती, पालक शिक्षक संघ ,मुख्याध्यापक , उप मुख्याध्यापक श्री.नाडेकर आर. बी., पर्यवेक्षक सौ.पाटील के.ए.यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
