आठ एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव दि. 05 ( प्रतिनिधी )- मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहय्यक विभागाअंतर्गत सहय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेवून त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी सहय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरा समोर महाबळ रोड जळगाव येथे 8 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 ते दु. 1.00 या वेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. असे सहय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
