कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात "गुड टच, बॅड टच" विषयी मार्गदर्शन संपन्न
❇️नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्या द्वारे केले प्रबोधन
चोपडा,दि.१८(प्रतिनिधी); कै .हि. मो. करोडपती माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, चोपडा जि जळगांव च्या विद्यार्थिनींनी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आरोग्या विषयी मार्गदर्शन करून 'गुड टच, बॅड टच' याविषयी जाणीव करून देत किशोर वयीन मुलींमध्ये होणारे बदल,मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यासोबत विद्यार्थ्यांचे वजन, उंची याचे मोजमाप करून आरोग्य तपासणी केली. यात वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी आरोग्य व सामाजिक समस्याबाबत प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.
यावेळी प्रा माळी सर यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मंगेश भोईटे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आर आर बडगुजर तर आभार प्रदर्शन श्री ए पी बडगुजर यांनी केले. यावेळी श्रीमती व्ही बी साळुंखे, श्रीमती सी पी बडगुजर,श्रीमती पी सी बडगुजर,श्रीमती एस टी बोरसे, श्रीमती दिपाली बडगुजर, श्रीमती शर्मिला बडगुजर मॅडम, श्री संजोग साळुंखे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अशोक बडगुजर, श्री सुनिल बडगुजर, श्री विलास सनेर सहकार्य केले.
