चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची जिल्ह्यात आगळीवेगळी छाप" डॉ . विकासकाका हरताळकर ♦️संघ कार्यालय व खुल्या व्यायाम शाळेचे शानदार उद्घाटन

 चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची जिल्ह्यात आगळीवेगळी छाप" डॉ . विकासकाका  हरताळकर 

♦️संघ कार्यालय व खुल्या व्यायाम शाळेचे शानदार उद्घाटन

  चोपडा दि.१८(प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाचे सुंदर ,सुसज्ज असं कै . मगनलाल रामदास बडगुजर ( साळुंखे ) सभागृह ,  आमदार प्रा . आण्णासो . श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या तत्कालिन निधीतून उभारलेले ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय , जिल्हा क्रीडा विभाग व न .प . चोपडा यांच्या सहकार्याने तयार झालेली खुली व्यायाम शाळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सतत विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करणारा चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ हा उत्तम रित्या कार्यरत असणारा जिल्हयातील कदाचित एकमेव व सर्वात अग्रेसर असा संघ आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा कार्यालय व खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन  प्रसंगी सोहळा अध्यक्ष चोपडयाचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ . विकास हरताळकर यांनी काढलेत .

यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संदर्भात विशेषतः मधुमेह जो हळूहळू आपलं शरीर पोखरत डोळे , किडनी यांना खूप नुकसान पोहचवतो तरी त्या संदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन व आवाहन केले .

ज्येष्ठ नागरिक संघ , चोपडाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमान आमदार प्रा.आण्णासो . श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकात सोनवणे यांच्या शुभहस्ते संघ कार्यालय तसेच खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन असा नियोजित उद्घाटन सोहळा होता परंतु मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.श्री . एकनाथजी शिंदे यांच्याकडे महत्त्वाच्या कामानिमित्त जावे लागल्याने  मा.प्रा . आण्णासो.श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी उद्धाटन सोहळ्यास आवर्जुन शुभेच्छा पाठविल्या . संघ कार्यालय कोनशिला अनावरण व कार्यालय उद्घाटन तसेच खुली व्यायाम शाळा उद्घाटन सोहळा प्रसंगी न.प.मुख्याधिकारी श्री .राहुल पाटील , कृ .उ.बा. संचालक श्री . गोपाल पाटील , ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह बांधकामास अनमोल देणगी दाते श्री .विश्वनाथ रामदास बडगुर्जर ( साळुंखे ) , माजी नगराध्यक्ष श्री . रमणलाल गुजराथी , बंधन बँक शाखा व्यवस्थापक श्री .भरत पवार या मान्यवरांसह संघाध्यक्ष श्री .जयदेव देशमुख , उपाध्यक्ष श्री . जे . एस .नेरपगारे , सह सचिव इंजि . विलास एस् .पाटील , कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील ,  संघ कार्यकारीणी ज्येष्ठ संचालक एम् .डब्ल्यू . पाटील , माजी कोषाध्यक्ष मुख्या . सुभाष पाटील , मधुकर पाटील अश्या अनेक आजी माजी कार्यकारिणी संचालक तसेच सदस्यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचा प्रारंभ विनय पाठक यांच्या बासरी वरील गणेश वंदनेने तसेच जिजाबराव नेरपगारे यांच्या प्रार्थनेने झाला .सोहळयाचे प्रास्तविक माजी सचिव एन.डी.महाजन यांनी तर  आभार प्रा .श्याम गुजराथी  यांनी मानलेत . पसायदानाने सांगता झालेल्या या उद्घाटन  सोहळयाचे स्वागत सूत्रसंचालन तालुका फेस्कॉम सचिव शांताराम पाटील व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघ सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने