आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कलाशिक्षक कमलेश गायकवाड सन्मानित..जगातील १२ ,भारतातून ७ तर महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तींचा समावेश

 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कलाशिक्षक कमलेश गायकवाड सन्मानित..जगातील १२ ,भारतातून ७ तर महाराष्ट्रातील  एकमेव व्यक्तींचा समावेश 

चोपडा दि.१८( प्रतिनिधी)World Human Organization INTERNATIONAL JUNNO AWARD 2024,BEST CREATIVE AND EXPLANATORY ARTहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर या विद्यालयाचे कलाशिक्षक, चित्रकार , कवी  कमलेश गायकवाड यांना नुकताच लखनऊ ,उत्तर प्रदेश येथे झालेल्या  दिमाखदार कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 

वर्ल्ड हुमन ऑर्गनायझेशनच्या विशेष समितीकडून कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांची निवड करण्यात आली . विशेष बाब म्हणजे या पुरस्कारासाठी जगातील१२ व्यक्तींची निवड करण्यात आली त्यात भारतातील ७ व्यक्तीं आणि त्यात ते महाराष्ट्रातील एकमेव  पुरस्कारार्थी चित्रकार ,कलाशिक्षक कमलेश गायकवाड . यापूर्वीही अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय  विविध विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले.

कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड ह्यूमन ऑर्गनायझेशन तर्फे इंटरनॅशनल जुनो अवार्ड बेस्ट क्रिएटिव्ह अँड एक्सप्लेनेटरी आर्ट हा बहुमान हॉटेल विश्वनाथ ,चारबाग, लखनऊ, उत्तर प्रदेश  येथे  प्रमुख अतिथी श्री .वीर अंजनी कुमार  सक्सेना जी चेअरमन- जी प्रेसॉन  कंपनी लिमिटेड व प्रसिद्ध उद्योजक  व जगातील सर्वात मोठे पेंटिंग्स बनवून वर्ल्ड रेकॉर्ड करणारे ज्येष्ठ चित्रकार व  वर्ल्ड ह्यूमन ऑर्गनायझेशनचे प्रेसिडेंट माननीय श्री .प्रवीण भूषण श्रीवास्तव यांच्या हस्ते आकर्षक सन्मानपत्र, शाल,  वर्ल्ड ह्यूमन ऑर्गनायझेशनचे विशेष मेडल, पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांनी सर्व मान्यवरांना जलरंगात तयार केलेली आकर्षक निसर्गचित्रे भेट म्हणून दिलेत. तसेच वर्ल्ड हुमन ऑर्गनायझेशनच्या पुस्तकात सरांचे कला विषयातील कार्य अर्थात जीवन परिचय प्रथम क्रमांकावर छापण्यात आले असून कार्यक्रमातील सर्व मान्यवरांना ते भेट म्हणून देण्यात आले. 

या कार्यक्रमात कमलेश गायकवाड सर यांनी कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले.त्यात चोपडा एज्युकेशन सोसायटीची व आपल्या मातृ मंदिराची यशोगाथा सरांनी सांगितली. हा  पुरस्कार माझ्या आदर्श संस्थेचा, शाळेचा,विद्यार्थ्यांच्या  आणि मला घडवणाऱ्या आई-वडिलांचा सन्मान आहे,मी मात्र एक माध्यम आहे .अशी भावना त्यांनी व्यक्त केली .  

या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल  चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अध्यक्ष  सौ. शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष श्री.विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन श्री. राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, श्री.चंद्रहासभाई गुजराथी , श्री .भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशभाई जैन, श्री प्रवीणभाई गुजराथी श्री किरणभाई गुजराथी संस्था समन्वयक श्री.गोविंदभाई गुजराथी,मुख्याध्यापक श्री. प्रशांतभाई गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री.पी.डी.पाटील,उपप्राचार्य श्री.जे.एस. शेलार,पर्यवेक्षक श्री. एस. एस. पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती.एम डब्ल्यू पाटील, पर्यवेक्षक श्री. ए. एन. भट सर, विविध ज्ञान शाखांचे प्रमुख शिक्षक, पालकांनीही कौतुक केले. तसेच भगिनी मंडळ चोपडा, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चोपडा ,ललित कला चोपडा तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालय प्रमुख , महाराष्ट्रातील विविध कवी मंच, भारतीय बौद्ध महासभा,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ , चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघ ,जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक शिक्षकेतर संघ,विमल वाणी बहुउद्देशीय सामाजिक ,शैक्षणिक संस्था म्हसावद , नक्षत्रांचे देणे काव्यमंच पुणे,  खानदेश साहित्य संघ सुरत , यांसारख्या विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या पुरस्कारामुळे कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या महाराष्ट्राचे, जिल्ह्याचे आणि चोपड्याचे नाव उंचावणारे कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांना विविध माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने