महाराष्ट्रात इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे १८ वे वार्षिक अधिवेशन संपन्न ..चोपडा चे डॉ विशाल पालीवाल होते प्रमुख वक्ते
छत्रपती संभाजी नगर दि.१८(प्रतिनिधी) येथे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृहा मध्ये इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे जनक डॉ. सी.सी. मॅटी यांच्या २१६ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोहोमिओपॅथी आणि पारंपारिक चिकित्सक असोसिएशनचे १८ वे वार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले .
या कार्यक्रमात अध्यक्षा म्हणून फुलंब्री विधानसभेच्या आमदार श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण तसेच उद्घाटक म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, श्री. राहुल भैया लोणीकर, प्रमूख पाहुणे म्हणून भाजपा मुख्य प्रदेश प्रवक्ते आणि राज्य मेडिकल सेल चे मुख्य समन्वयक डॉ. स्वप्नील मंत्री, माजी जि. पं. अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे उपस्थित होते.
आपल्या संबोधनात मान्यवरांनी इलेक्ट्रोहोमिओपॅथी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन म.रा.इ.पा.चि. असोसएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर शेळके यांना दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जळगाव येथील प्रमुख व्याख्याते डॉ. विशाल पालीवाल यांनी इलेक्ट्रोहोमिओपॅथीचा संक्षिप्त वैज्ञानिक परिचय दिला आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथीची सद्यस्थिती आणि नवीन संशोधन व विकासाबाबत माहिती दिली कोल्हापूर येथील व्याख्याते डॉ. राजवर्धन यांनी वंध्यत्व आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथी उपचारांबद्दल माहिती दिली. डॉ जाधव यांनी बाह्य अनुप्रयोग , डॉ डोळस, डॉ यासीन शेख, डॉ संतोष पाटील, डॉ सुभाष कुऱ्हाडे इत्यादी विविध क्षेत्रातून आलेल्या चिकित्सकांनी त्यांचे अनुभव सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने चिकित्सक उपस्थित होते.
*हा कार्यक्रम प्रसंगी म.रा.इ.पा.चि. असोसिएशनचे अध्यक्ष मां. श्री.डॉ. चंद्रशेखर शेळके, कार्यकारी अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख आणि डॉ. सुधीर आंबेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेश कुटे, उपाध्यक्ष डॉ. शेळवणे काका, सचिव डॉ. निवृत्ती रायजी शिंदे, राज्य सल्लागार मा. पंचायत समिती सभापती डॉ. राजेश राऊत, राज्य उपाध्यक्ष डॉ. नितीन दादा परदेशी, राज्य समन्वयक डॉ नारायण पोलावर, डॉ. मंदाकिनी मजुमदार, डॉ. रमेश आर्ले, डॉ. राजेश चिद्रवार, डॉ. अतुल पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले*.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुधीर आंबेकर यांनी सर्व पाहुण्यांचे आणि वक्त्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
