विवेकानंद विद्यालयात ११रोजी शिक्षण चिंतन परिषद.. दीपस्तंभ मनोबल संस्थेचे संचालक व गाढे अभ्यासक यजुर्वेंद्र महाजन यांचे व्याख्यान

 

विवेकानंद विद्यालयात ११रोजी शिक्षण चिंतन परिषद.. दीपस्तंभ मनोबल संस्थेचे  संचालक व गाढे अभ्यासक यजुर्वेंद्र महाजन यांचे व्याख्यान

चोपडा दि.८(प्रतिनिधी)विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित वि्विवेकानंद विद्यालयात शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वा शिक्षण चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले असून जळगांव येथील दीपस्तंभ व मनोबल संस्थेचे  संचालक व  शिक्षणक्षेत्र अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते श्री. यजुर्वेंद्र महाजन यांचे "२१ व्या शतकासाठी मनुष्यघडणीचे शिक्षण" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

श्री.यजुर्वेद्र महाजन हे दीपस्तंभ फाउंडेशन संस्थापक,राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समिती सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार. स्वतंत्र निर्देशक, नॅशनल प्रोजेक्टस् कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. (भारत सरकारचा उपक्रम) तज्ञ सदस्य, दिव्यांग विद्यापीठ स्थापना समिती (महाराष्ट्र सरकारचे सदस्य आहेत.

तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहनअध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार ,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड. रविंद्र जैन,सहसचिव डॉ. विनीत हरताळकर,मुख्याध्यापक माध्यमिक नरेंद्र भावे , ज्युनिअर कॉलेज प्राचार्य प्रमोद पाटील व सर्व विश्वस्त विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र, चोपडा यांनी केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने