लासुर ग्रामपंचायतीच्यावतीने पत्रकार दिनी.. स्थानिक पत्रकारांचा सत्कार
लासुर ता.चोपडा,दि.८(वार्ताहर)-येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधत लासुर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि गावातील पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच नर्मदाबाई भिल होते. तर कार्यक्रमास उपसरपंच अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार हा लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असून पत्रकारिता करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते असे प्रतिपादन उपसरपंच अनिल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.यावेळी पोलीस पाटील जितेंद्र पाटील, ग्रा पं सदस्य विकास वाघ,मुश्ताक पठाण,विवेक कोळी तसेच संजय पाटील,वना पवार यांसह ग्रा पं कर्मचारी उपस्थित होते.पत्रकार दिनाच्या संध्येला कै.वना पटाईत यांच्या स्मरणार्थ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दिपक पटाईत यांच्यावतीने ह.भ.प साहिल महाराज तळेगावकर यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पालीवाल,श्री नाटेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पालीवाल,पत्रकार आत्माराम पाटील,कैलास बाविस्कर,अजय पालीवाल,देवीलाल बाविस्कर, ह.भ.प बापू चौधरी,परेश पालीवाल,रमेश महाजन,महेंद्र महाजन आदी पत्रकार उपस्थित होते.