चोपडा महाविद्यालयात 'लेखक-वाचक संवाद 'कार्यक्रम' संपन्न

 

चोपडा महाविद्यालयात 'लेखक-वाचक संवाद 'कार्यक्रम' संपन्न

चोपडा,दि.८(प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत दि.६ जानेवारी २०२५ रोजी 'लेखक व वाचक संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाप्रसंगी जवळपास २०० विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते.

     याप्रसंगी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्र.रजिस्ट्रार डी.एम.पाटील, विनोदी कवी विलास पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार, ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे, सौ.ए.व्ही.जाधव, डॉ.आर. आर. पाटील आदि उपस्थित होते.

   यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खान्देशातील सुप्रसिद्ध विडंबन कवी विलास पाटील यांनी मार्गदर्शन करून वाचकांशी संवाद साधला. तसेच विनोदी कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले.याप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख डॉ.डी.एस.पाटील व कवी डॉ.एम.एल.भुसारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

            या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी जागृती निर्माण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी एस. ई.चौधरी,  कु.के.टी.वासनिक, अमोल पवार व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने