चोपड्यातील शिक्षक एल .एच. अहिरे क्रांतीसुर्य महात्मा फुले पुरस्काराने गौरवीत
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील श्रीमती अनुसयाबाई मुकुंदराव साळुंखे विद्यालयाचे मुख्याध्यापक लोटन हिरामण अहिरे यांना तारीख 5 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मूळ अमळनेर येथील रहिवासी असलेले एल.एच .अहिरे हे सेवानिवृत्त कालखंडापर्यंत चोपड्यात गेल्या 35 वर्षापासून विद्यादानाचे कार्य करत असून, विविध क्षेत्रात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय गुणवंत गौरव पुरस्कार सोहळा २०२५ या कार्यक्रमात त्यांना नितीश कुमार भरगुडे पाटील अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद माननीय श्री जयकुमार गोविंदराव खरात उपकोषागार अधिकारी मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार ., अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन सातारा येथील मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुटुंबीयांसोबत त्यांनी हा पुरस्कार मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह या स्वरूपात स्वीकारला. चोपडा येथील संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट संदीप भैया पाटील, सचिव स्मिताताई पाटील, मुख्याध्यापक एल एस पाटील, विशेष छायाचित्रकार छोटू वार्डे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.