चोपडयाचे मयूर जैन यांचे 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण.. तब्बल १० महिन्यात 18000 किलोमीटर सायकलिंगचा अजूबा

 चोपडयाचे मयूर जैन यांचे  250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण.. तब्बल १० महिन्यात 18000 किलोमीटर सायकलिंगचा अजूबा

चोपडा दि.७(प्रतिनिधी)येथील प्रिया बेकरीचे चालक-मालक श्री मयूर जैन यांनी आज 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण केली असून गेल्या दहा महिन्यात एकही दिवसाच्या खाडा न पाडता 18000 किलोमीटर सायकलिंग केली आहे.विशेष म्हणजे प्रति दिवशी 50 किलोमीटरच्या खाली त्यांनी सायकल चालवली नाही त्यांच्या कर्तबगारीचे शहरवासियांनी जोरदार स्वागत करून अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे.

 त्यांनी शारीरिक सुदृढता आणि आरोग्यासाठी  सायकलिंगला सन 2023 प्रारंभ केला असून लहान लहान राइटड्स करून ते अर्धशतकी आणि शतकी राइटड्स कडे झेपावू लागले आहेत .रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या स्वतःच्या बेकरी इंडस्ट्रीमध्ये कार्यभार सांभाळून पहाटे न चुकता साडेतीन वाजेला उठून चार वाजेला राईडला प्रारंभ करतात.

 चोपडा सायकलीस्टचे अध्यक्ष उदय पाटील यांचे खास मार्गदर्शन श्री. मयुर  जैन यांना  लाभले आहे.चोपड्यातून पहिले एस आर होण्याचा मानही पटकावून . बी आर एम ही स्पर्धा करताना 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरचा पल्ला गाठून  क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.त्यांच्या उपरोक्त 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण केल्याने अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने