गणपूर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन
गणपूर(ता चोपडा) ता 16(प्रतिनिधी): येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख श्री सोनवणे,शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती पाटील,सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यात पस्तीस स्टॉल मांडण्यात आलेले होते. त्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ घरून बनवून आणले होते.बाल आनंद मेळाव्यात त्याची विक्री केली. आणि त्याचा हिशोबही ठेवला. त्यातून सुमारे तीन हजार रुपयांची खाद्यपदार्थांची विक्री यावेळी झाली. बाल आनंद मेळाव्याला भवाळे प्राथमिक शाळा व विकास माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, शिक्षण प्रेमी व नागरिकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी मुख्याध्यापक संजू पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोईटे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार राजेंद्र पारे यांनी मानले.मेळाव्याला शिक्षकांसह नागरिकांनी भेट देऊन पदार्थांचा आस्वाद घेतला.........
गणपूर (ता चोपडा) बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मांडणी केलेले स्टॉल