आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनीभोकर येथे तापी नदीवर तात्पुरता (कच्चा) पूलाच्या कामाला सुरुवात

 आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी भोकर येथे तापी नदीवर तात्पुरता (कच्चा) पूलाच्या कामाला सुरुवात

चोपडादि.२३ (प्रतिनिधी )--- जळगाव भोकर मार्ग चोपडा तापी नदी वर मोठ्या पुलाचे काम सुरू असुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातुन प्रवास करावा लागत असल्यामुळे अनेक दिवसांपासून कच्चा तात्पुरता हंगामी पूल तयार करावा अशी मागणी रोज होत होती पंरतु आचारसंहिता,निवडणुका अश्या विविध कारणांनानी ह्या पुलाकडे कोणीही लक्ष दिले नव्हते मात्र आता  आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानी श्री.गुलाब भाऊंनी या गोष्टीची दखल घेऊन तापी नदीवर कच्चा फुल बनवण्यास सांगितले त्या कामाला आजपासून सुरुवात झाली असून लवकरच त्या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे.

 ह्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोजचे जात असतात तसेच धरणगाव, व इदगाव मार्गे जाण्यापेक्षा भोकर मार्गे जाण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशी इच्छुक असतात त्यामुळे हंगामी पूल झाला तर प्रवाश्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल ह्या कामासाठी आ.चंद्रकांत सोनवणे,व ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाणी ह्या कामाला सुरुवात झाली आहे लवकरच हा पूल रहदारी साठी कामासाठी येणार आहे या सर्व गोष्टीची चोपडा वासियांना व जळगाव वासियांना खुप मोठया प्रमाणावर आनंद होत आहे तर आमादारानी कामाचा धडाका लावला आहे त्यासाठी चोपडा तालुक्यातील जनता त्यांचे आभार मानत आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने