पंकज इंग्लिश मिडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन 'रिमझिम जल्लोषात साजरा
चोपडा दि.२३(प्रतिनिधी) :- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित, पंकज इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे रिमझिम 2024 सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कु. दिशा विजय पाटील, सौ. कावेरी कमलाकर मॅडम, सौ. आशा पंडित गजरे मॅडम, सौ. चंद्रकला पाटील मॅडम, अरुण ग्यानसिंग बारेला , सायसिंग बारेला , चि. चेतन रेलसिंग बारेला, संजय हरी पाटील व अनिल तापीराम बारेला या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक - नारायण बोरोले, संस्थेचे युवा संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले तसेच गोकुळ भोळे, सौ. हेमलता बोरोले, सौ.दिपालीताई बोरोले, रविंद्र अग्रवाल , मनिष पारिख, पंकज पाटील व भारंबे साहेब, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर.अत्तरदे , पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि.आर पाटील , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्हि.पाटील , पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलींद पाटील ,पंकज बाल संस्कार केंद्राच्या विभाग प्रमुख सौ. मीना माळी हे मान्यवर उपस्थित होते.
'रिमझिम २०२४' या यावर्षीची थीम मैत्रीवर आधारित होती. यात मोटू - पतलू, कृष्णा - सुदामा, तसेच, विशेष आकर्षण म्हणजे मतिमंद मुलांसाठी प्रोत्साहन पर नाटिका या विविध विषयांवर आधारित नृत्यविष्कार सादर केलेत.
पंकज इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य केतन माळी यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश साळुंखे व शिक्षक दिवाकर सैंदाणे यांनी केले. आभार सौ. सुनीता सैंदाणे, सौ. अनिता पाटील यांनी केले.