ईव्हीएम हटाव देश बचाव चोपड्या त सह्यांची मोहीम

 ईव्हीएम हटाव देश बचाव चोपड्या त सह्यांची मोहीम 


चोपडा दि.१५(प्रतिनिधी) शहरातील शिवाजी चौकात आज दिनांक 16 रोजी पहाटे आठ वाजेपासून ईव्हीएम हटाव देश बचाव या मोहिमेला नागरिकांनी सह्या करून मोठा प्रतिसाद दिला. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे नेते एडवोकेट संदीप भैया पाटील, यांचे नेतृत्वाखाली माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती,आमदार कैलास बापू पाटील, या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सह्या करण्यासाठी प्रोत्साहित केले. दिवसभरातून दहा हजारावर सह्या केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश सिताराम पाटील यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी चौकात मंडप टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात आपला निषेध नोंदवला व सह्याही केल्या. अनेक सुशिक्षित महिलांनी सह्यांच्या मोहिमेत भाग घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, व शिवसेना उ. गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या स्वाक्षरी केल्या. चोपडा त्यामुळे मेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर संजय बोरसे, राजेंद्र पाटील, सुरेश बाबू पाटील, प्रमोद पाटील, तसे च असंख्य मुस्लिम बांधवांनी ईव्हीएम विरोधात आपला सह्या करून निषेध नोंदवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने