झुरखेडा येथील बागेश्वर धाम कथेसाठी चोपडा आगारातुन जादा बसेस

 झुरखेडा येथील बागेश्वर धाम कथेसाठी चोपडा आगारातुन जादा बसेस 


चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) दिनांक २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत झुरखेडा ता धरणगाव येथे पंडीत धिरेंद्र शास्त्री ( बागेश्वर महाराज) यांच्या मधुर वाणीतुन  श्री हनुमान  कथेचे आयोजन करण्यात आले असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन कथेसाठी दिनांक २६ डिसेंबर पासुन जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या सह प्रशासन बागेश्वर धाम कथेला जाणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मागणी नुसार बसेस उपलब्ध करून देणार आहेत.तरी झुरखेडा येथे कथेसाठी जाणाऱ्या भाविकांनी जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने