बालमोहन विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 बालमोहन विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयात आज साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास अमर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, अमर संस्थेचे व्यवस्थापक आर डी पाटील, बालमोहन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे , पालक प्रतिनिधी दिनेश पवार आदी उपस्थित होते

साने गुरुजींच्या प्रतिमेचे व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली साने गुरुजींची ओळख व साने गुरुजींचे आई वरील प्रेम ,आईची शिकवण, आपले काम आपण स्वतः करावे, याविषयी शिक्षिक प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना छान छोटीशी गोष्ट सांगितली तसेच शिक्षिक रोहिणी कापडणे यांनी देखील विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे आई वरील प्रेम याविषयी छोटीशी गोष्ट सांगितली तसेच सौ रेखा नेवे मॅडम यांनी देखील मुक्या कळ्या विषयी साने गुरुजींची छोटीशी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली व त्यानंतर साने गुरुजी जयंती निमित्त शाळेत विविध क्रीडा स्पर्धा रनिंग स्पर्धा, वस्तू उचलून पळणे ,संगीत खुर्ची गोण पाटी उडी या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाचे बक्षीस गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने