चोपड्याची कन्या कल्याणी पाटील ह्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव.. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाली होती शाब्बासकीची थाप
चोपडा दि.२३(प्रतिनिधी): अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील उपसरपंच सौ.कल्याणी प्रफुल्ल पाटील ह्यांना पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तर्फे स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मन की बात कार्यक्रमात भ्रमणध्वनीवरून संवाद साधत तुमचे नाव कल्याणी आता गावाचे ही कल्याण करा असा सल्ला देत सेंद्रिय शेती व जलसंधारण विषयावर चर्चा केली आहे.
सौ.कल्याणी प्रफुल्ल पाटील हया जे.डी.सी.सी. बॅंकेच्या चोपडा शाखाधिकारी श्री .सतीश पाटील यांच्या सुकन्या आहेत. त्यांनी जलजीवन मिशनच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देवून आपल्या गावासाठी जलस्त्रोत निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.त्याअनुषंगाने त्यांचा गौरव पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यातर्फे स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंकज समूहाचे संस्थापक सुरेश बोरोले,संचालक पंकज बोरोले,माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्री अविनाश पाटील ,संस्थेचे विविध पदाधिकारी, पंकज स्कूलचे प्राचार्य, प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक मुख्याध्यापक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.