"प्रशासन गाव की ओर"मोहिमेची चोपड्यात जोरदार अंमलबजावणी .. उपजिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारींची उपस्थिती
चोपडा दि.२३(प्रतिनिधी)लोक शिकायत और पेन्शन मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रशासन गाव की ओर ही मोहीम दिनांक १९ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान राबविण्यात येत आहे...सदर मोहिमेदरम्यान चोपडा तालुकास्तरावर लोकांच्या तक्रारी विविध प्रश्न समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आले..
सदर लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी यांच्यावतीने श्रीमती अर्चना मोरे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना या उपस्थितीत होते. तसेच उपविभागीय आधिकारी श्री नितीन कुमार मुंडावरे लोकशाही दिनास उपस्थितीत होते. तालुक्यातील पुढील ग्रामास्थानच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.. तसेच प्राप्त तक्रारीवर योग्य ते दिशा निर्देश देण्यात आले..
. 1. प्रभाकर जामराव पाटील रा. घडवेल 2. धनसिंग नत्थू अलकरी रा. रामपुरा चोपडा ३. मिनार भरत भिल्ल रा. चोपङा 4. राधाबाई वासुदेव भिल.5 महेंद्र चंदूलाल पाटील आङगाव 6.भरत अशोक पाटील असावा यांनी अर्ज दाखल केले आहेत.सदर लोकशाही देण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख हे उपस्थित होते.
यावेळी राहुल पाटील मुख्यधिकारी नगरपालिका चोपडा, एस दि साळवे पोलीस निरीक्षक, डॉ. प्रदीप लासुरकर, तालुका आरोग्य अधिकारी चोपडा, नरेंद्र सोनवणे गटशिक्षणाधिकारी चोपडा, के पी जगताप उपकार्यकारी अभियंता चोपडा, पी जे अहिरे कृषी विस्तार अधिकारी, डी आर पुरोहित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, डी बी साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा, के वाय शेख वनपरिक्षेत्राधिकारी वैजापूर, बीके थोरात वनपरिक्षेत्राधिकारी चोपडा, एस एम सोनवणे वनपरिक्षेत्राधिकारी वैजापूर, गंगा आढाव कनिष्ठ अभियंता चोपडा उपविभाग, किरण देवराव मेश्राम पुरवठा निरीक्षक अधिकारी, गणेश सुभाष सोनवणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा, राजेंद्र वाणी सहायक दुय्यम निबंधक चोपडा उपस्थितीत होते.