जळगाव येथील स्टेट बँक दाणा बाजार शाखेच्या प्रतिनिधीच्या तत्परतेने ग्राहकाला मिळाली विम्याची रक्कम

 जळगाव येथील स्टेट बँक दाणा बाजार शाखेच्या प्रतिनिधीच्या तत्परतेने ग्राहकाला मिळाली विम्याची रक्कम 


जळगाव,दि.२३(प्रतिनिधी)खुबचंद सागरमल या शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता सतिष साळुंखे याचे स्टेट राज्य सॅलरी पॅकेज (SGSP) या अंतर्गत त्यांचे आणि पतीचे जळगाव शहरातील स्टेट बँक, दाणा बाजारातील शाखेत खाते होते, सोबत त्याच्या पतीचे पण खाते होते परंतु काही दिवसांपूर्वी ललिता सतिष साळुंखे यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या पतीना श्री सतीष वामन साळुंखे यांना स्टेट बँक दाणा बाजार शाखेतर्फ रू ४० लाख आणी त्यांची मुलगी अविवाहित असल्याने रु ५ लाख असे एकुण रु ४५ लाख स्टेट बँक शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री धर्मेंद्र कुमार सर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी दाणा बाजार शाखेचे व्यवस्थापक श्री नटराज काले सर , सोबत स्टेट बँक दाणा बाजार शाखेची प्रतिनिधी धनश्री चौधरी मॅडम आणि स्टाफ.यात धनश्री चौधरी यांच कार्य मोलाचे आहे, पुर्ण मार्गदर्शन, कागदाची पुर्तताआणि वरुन चेक येईपर्यंत ग़ाहक आणि बॅंक या मध्ये समन्वय साधणं हे मोलाचे कार्य.असेच जर सर्व बॅंकामध्ये प्रतिनिधी असेल ग़ाहकांचे काम लवकरात लवकर आणि कमी श्रमात होतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने