दहिवद जवळ ओमिनी व मोटरसायकलचा भीषण अपघात..चोपड्याचे ३जण जागीच ठार ,चौघे गंभीर जखमी

 दहिवद जवळ ओमिनी व मोटरसायकलचा भीषण अपघात..चोपड्याचे ३जण  जागीच ठार ,चौघे गंभीर जखमी

चोपडा दि.७(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाजवळ ओमिनी गाडी व  मोटरसायकल अपघातात तीन तरुण गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.तिघे मयत चोपडा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये  शुभम पारधी, विजय पारधी व सोनू पाटील  या तिघांचा समावेश असून जखमींना अमळनेर, धुळे व चोपडा येथे हलविण्यात आले आहे. घटना दिनांक ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून काही जखमींची अवस्था चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

चोपडा येथील  येथील शुभम पारधी, सोनू पाटील व विजय पारधी  अन्य  चार जण जखमी  हे अमळनेर वरून केटरर्स चे काम करून घरी येत असताना ही दूर्दैवी घटना घडली आहे. जखमी ज्ञानेश्वर सोनार रा सुरत याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.  काही जखमी हे मंगरूळ येथे केटरर्स चे काम करण्यासाठी आल्याचे समजते.चोपडा येथील लोहिया नगर मधील पियुष दीपक मिस्त्री ऊर्फ साई हा गंभीर जखमी झाला असून त्यास हात पाय व डोक्याला जबर मार लागला आहे त्याचेवर मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.तर अन्य दोन जणांवर अमळनेर येथील श्री अॅक्सिडेंट हाॅस्पीटलमध्ये  उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे समजते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने