लासुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्ताने प्रतिमा पूजन
लासुर ता.चोपडा दि.७(प्रतिनिधी) : लासुर येथील पंचशील नगर मध्ये 6 डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले . उपस्थित उपसकानी सामुहिक त्रिशरण, पंचशील व भीमस्मृती म्हटली .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंचशील नगर मधील माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, पीक संरक्षण सोसायटीचे मा.व्हा .चेअरमन दिनकर पवार ,जी एस सपकाळे सर, दयाराम सपकाळे, सुखदेव बाविस्कर, श्रावण बाविस्कर, यशवंत बाविस्कर ,अशोक संदांशिव मुडीवाले ,रवींद्र करंदीकर, प्रकाश बावीस्कर व भुषण करंदीकर यांनी प्रतिमेचे पूजन केले.